हडपसर येथे युवकाची टोळक्याकडून बेदम मारहाण करून हत्या

पुणे : द फायर - प्रतिनिधी

हडपसर परिसरात शुल्लक कारणावरून एका १६ वर्षाच्या युवकाला टोळक्याने विवस्त्र करून तीक्ष्ण हत्याराने आणि लाथा-बुक्यांनी मारहाण केली. या युवकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाणीनंतर या युवकाच्या चेहऱ्यावर टोळक्यातील तरुणांनी मूत्रविसर्जन केले. आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला.

या प्रकरणी विनीत सूर्यकांत बिरादार (वय १९), शुभम राजाभाऊ जाधव (वय १९, रा. समर्थनगर, पिंपरी-चिंचवड), देविदास उर्फ देवा घनशाम पाहणे (वय २१, रा. काळेपडळ), भारत विशाल राठोड (वय २१, कुंजीरवस्ती), सलीम कलिंदर शेख (वय २२, रा. घुलेवस्ती, मांजरी) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत युवक व त्याचे कुटूंबिय मांजरीत राहतात. दरम्यान, युवक १२ मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त घराबाहेर पडला होता. परंतु, रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही. यामुळे कुटंबाने हडपसर पोलिसांकडे धाव घेतली होती. त्या दरम्यान हडपसर पोलिसांना मांजरी रेल्वे रुळाजवळ एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्याला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या मुलगा तोच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांना बोलावून त्याबाबत खात्री केली.त्यावेळी त्याची ओळख पटली होती.

त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती. शुक्रवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यास येणार असल्याचे सांगितले.CommentsLeave a CommentWhatsApp