हेड कॉन्स्टेबलची पोलीस स्टेशनमध्येच गळफास लावून आत्महत्या

यवतमाळ : यवतमाळ पोलीस स्टेशनमढील डी.बी. रुममध्येच हेड कॉन्स्टेबलनेच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल राजू खंडुजी उईके (वय ५५ ) यांनी हे टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण काळालेलं नाही. राजू हे गुन्हे शाखेत होते कार्यरत होते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. राजू हे रात्री ड्युटीवर होते.

राजू उईके त्यांनी पहाटे १ पर्यंत गस्त दिली. त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. काही फोनही त्यांनी अटेंड केले आणि काही जणांशी बातचितही केली. त्यानंतर पहाटे त्यांनी DBरुममध्ये गळफास घेतला. त्यावेळी रुममध्ये कुणीही उपस्थित नव्हतं. रात्रीची वेळ असल्याने कर्मचाराही कमीच होते. सकाळी जेव्हा काही जणांनी रुममध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना धक्का बसला. त्यांनी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी आत्महत्या केली. आपली नोकरी जाणार या भीतीपोटी  व आजारामुळे कंटाळल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं आहे. पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या केल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरु केला आहे. उईके यांच्या जात प्रमाणपत्राबाबात पडताळणी सुरु होती. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते अशी माहिती सांगितली जात आहे.CommentsLeave a CommentWhatsApp