उद्यापासून शहरातील व्यापारी आस्थापने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार:संजय शेटे

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:   

१७ मे २०२०रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रक DMU/२०२० /CR.९२/ताDisM-१ प्रमाणे  तारीख ३१ मे २०२० पर्यंत त्यामध्ये वाढ केली आहे. या परिपत्रकानुसार  कोल्हापुर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांचे नवीन परिपत्रका नुसार (शॉपिंग मॉल सोडून) कोल्हापुर शहरातील सर्व व्यापारी उद्या दिनांक 22 मे पासून अस्थापणे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत सुरू करणेची आहेत.ही माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.

    कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कोल्हापूर यांचेवतीने सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे की, प्रशासन व व्यापारी प्रतिनिधी यांचे मध्ये चर्चा झाले प्रमाणे कोल्हापूर शहरामध्ये आस्थापने चालू करत असताना खालील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे.

१) प्रत्येक मालकाने व कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे अत्यावश्यक आहे.

२) दुकानाबाहेर एक मिटरच्या अंतराने चौकोन आखावेत.

३) मास्क लावलेल्या ग्राहकांना सॅनिटायझर देवूनच दुकानामध्ये प्रवेश देणे.

४) काऊंटर व ग्राहक यांचेमध्ये देखील एक मिटरचे अंतर ठेवण्यासाठी दोरी अथवा टेबल ठेवण्याची व्यवस्था करावी.

५) दुकान नेहमी सॅनिटायझर करुन स्वच्छ ठेवणे.

६) सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुण घेणे.

७) प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकान व दुकानाबाहेर ग्राहकांची अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

८) प्रशासनाने ठरवून दिलेली नियमावली अनुसार पालन करणे. दिलेल्या वेळेचे तंतोतत पालन करणे आवश्यक आहे. जर यात त्रुटी झाली व आपणांवर कायदेशीर कारवाई झाल्यास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व तिच्या सर्व संलग्न संघटना अजिबात जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी,असे संजय शेटे यांनी स्पष्ट केले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp