जिल्ह्यात 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ

कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. रुग्णसंख्या तसेच मृतांची संख्या ही वाढते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत 31 ऑगस्टच्या मध्यरात्री पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने दौलत देसाई यांनी हा यासंदर्भातील आदेश आज जारी केले. जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, प्रतिबंधित तसेच बंद क्षेत्रे खालीलप्रमाणे : -

-जिल्ह्याच्या सीमा बंदी आदेशाच्या या कालावधीत बंद राहतील व या कालावधीत आंतरजिल्हा मालवाहतूक जीवनावश्यक सेवा-सुविधा व अत्यावश्यक सेवासाठी होणारी वाहतूक आणि जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतूक वगळून उर्वरित सर्व वाहतूक प्रतिबंधित असेल.

-शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण, शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधित असतील.

-केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक, मेट्रो, रेल्वे व देशांतर्गत होणारी हवाई वाहतूक स्वतंत्र आदेशाद्वारे आणि एस ओ पी नुसार परवानगी घेतलेली वगळून.

-चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृह आणि असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित असतील.

-सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील.

-धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणची उपासना

-सर्व प्रकारचे बंदिस्त हॉल किंवा खोलीतील खेळ, जिम्नॅशियम इत्यादी

-जीवनावश्यक वस्तू व आरोग्याची कारणे वगळून 65 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया व दहा वर्षाखालील मुले यांना घराबाहेर पडणे प्रतिबंधित असेल.

-अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व मार्केट व दुकाने सकाळी नऊ पूर्वी व सायंकाळी सात नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतिल.

-सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे व विकणे प्रतिबंधित असेल.

-कंटेनमेंट क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबी संदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या- येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या सर्व आस्थापने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.CommentsLeave a CommentWhatsApp