यंदा गणेशोत्सव साधेपणाने शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: कोरोनाव्हायरस साथीमुळे यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रधान सचिव गृहविभाग अमिताभ गुप्ता यांनी आज शनिवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच मंडप मर्यादित स्वरूपाचे उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात फटाकेबाजी नसावी. तसेच श्री गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळ करता चार फूट व घरगुती गणेश मूर्ती दोन फुटांच्या मर्यादित असावी, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात .आले आहे यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेश मूर्ती ऐवजी घरातील धातु अथवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. ते शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी करावे.

वर्गणी देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या या जाहिराती प्रसिद्ध करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमा ऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. आरती, भजन किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही ही तसेच ध्वनि प्रदूषण यासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळ, इमारत आधी मधील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नयेत. कोविद 19  प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही ही या परिपत्रकात करण्यात आले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp