कोरोना पोहोचला सानेगुरुजी परिसरातील एका छोट्या कॉलनीत

कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी:

चीनमधून जगातील 210 पेक्षा अधिक देशात कोरोनाव्हायरसचा फैलाव झाला आहे. भारतातही एक लाखावर कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या आजाराने सर्वत्र पाय पसरले आहेत. कोल्हापूर शहरात ही या रोगाचे 19 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.  जिल्ह्यातील संख्या जवळजवळ  सव्वादोनशेच्या घरात गेली आहे. काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार आराम कॉर्नर परिसरातील एक महिला व तिची दोन मुले तसेच सानेगुरुजी परिसरातील एका छोट्या कॉलनीतील युवतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

 सानेगुरुजी परिसरातील बिडी कॉलनी भागातील एका छोट्या कॉलनी तील एका युवतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कालरात्री हा अहवाल प्राप्त होतात परिसर बॅरिकेट्स उभे करून सील करण्यात आला. तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आज सकाळी या युवतीचे वास्तव्य असलेल्या परिसरात आरोग्यविषयक आवशक्य उपायोजना महापालिकेच्या यंत्रणेने हाती घेतली. कोरोंना बाधित आढळलेली युवती बाहेरगावाहून घरी परतली आहे. तिला घरीच होम क्वारंटईन करण्यात आले होते. रात्री तिला सीपीआरमधील कोरोना आजाराच्या रुग्णासाठी असलेल्या स्वतंत्र कक्षात हलविण्यात आले. तसेच तिच्या संपर्कातील व्यक्तींची यादी करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. कोल्हापुरातील पहिली कोरोना बाधित महिला कसबा बावड्यातील मराठा कॉलनीत आढळली होती. त्यानंतर आता शहराच्या उपनगरापर्यंत कोरोना पोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे ही शहरवासीयांच्या दृष्टीने मोठी धक्कादायक बाब आहे.CommentsLeave a CommentWhatsApp