डॉ.रामानंद यांच्या नियुक्तीस विरोध करण्यामागे सीपीआरमधील लुटारू टोळके : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर:द फायर: प्रतिंनिधी:

राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून गेले काही दिवस संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वास्तविक डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सीपीआर रुग्णालयासह शासकीय महाविद्यालयाचे काम अत्यंत प्रामाणिक आणि चोखपणे सांभाळले आहे. त्यांच्या माध्यमातून रुग्णालयात विविध विभाग नव्याने सुरु करण्यात आले. तर सीपीआर मध्ये कडक अनुशासन तयार झाले. यातून सीपीआरमध्ये गैरकारभार करून पेशंट पळविण्याचे काम करणाऱ्या लुटारू टोळीचा पैसे मिळविण्याचा मार्ग बंद झाल्याने डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या नियुक्तीस या लुटारू टोळीने विरोध केला आहे. गोरगरीब रुग्णांना सीपीआरमधून खाजगी दवाखान्यात पळवीनाऱ्या सीपीआरमधील लुटारूनी डॉ.रामानंद यांच्या नियुक्तीस विरोध करू नये, अन्यथा त्यांची आपल्याशी गाठ असल्याचा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.

या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, डॉ. सौ. मीनाक्षी गजभिये या अधिष्ठाता पदावर कार्यरत झाल्यापासून गेल्या काही वर्षात सुरळीतपणे सुरु असणाऱ्या सीपीआर रुग्णालयात गैरकारभार करणाऱ्यांनी पुन्हा डोके वर काढले. डॉ.सौ.गजभिये यांच्या कारभारावरही शंका उपस्थित करण्यात आली. वास्तविक त्या स्वत: कोल्हापुरात काम करण्यास इच्छुक नसल्याचे त्यांच्या कामकाजावरून वाटते. डॉ.मीनाक्षी गजभिये यांच्यावर गैरकारभाराचे आरोप झाले आहेत. एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. याची जबाबदारी ही डॉ.गजभिये यांचीच आहे. पण, सीपीआर रुग्णालयाचा कारभार सुधारण्याचे प्रामाणिक काम करणारे डॉ. रामानंद यांच्या अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीस सीपीआरमधील काही डॉक्टर्स, कर्मचारी, तात्पुरते सेवेत असलेले दलाल यांनी आर्थिक मार्ग बंद होण्याच्या भितीपोटी जिल्ह्यातील जेष्ठ मंत्री महोदयांना गैरसमज पसरवून देवून डॉ.रामानंद यांची नियुक्ती थांबविली.

जेष्ठ मंत्री महोदयांनी डॉ.रामानंद यांच्या काळातील झालेल्या शस्त्रक्रिया, सीपीआरमधील सोयी- सुविधा यांची माहिती घेवून, त्याची शहनिशा करून डॉ.रामानंद यांच्या नियुक्तीस विरोध करणे उत्तम ठरेल. डॉ.रामानंद यांनी हजारो शस्त्रक्रिया आणि लाखो रुग्णांवर उपचार केल्याचे आम्ही ठामपणे सांगू शकतो,असे त्यांनी या पत्रकात म्हंटले आहे.  CommentsLeave a CommentWhatsApp