करोना अहवालाचा गोंधळात गोंधळ;खासगीचा पॉझिटिव तर सरकारी लॅबचा निगेटिव्ह अहवाल

मुंबई:

करोना अहवालाचा राज्यात गोंधळात गोंधळ अशी परिस्थिति आहे. काही खासगी लॅबमधून करोना संशयीतांचे आलेले पॉझिटिव अहवाल सरकारी लॅबमध्ये फेर तपासणीत निगेटिव्ह आढळले, तर उलट काही निगेटिव्ह आलेले अहवाल पुनर्तपासणीनंतर पॉझिटिव आल्याचे उघड झाले आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच बुधवारी दिली. नमुन्यांच्या तपासणीला अधिक कालावधी लागल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी. चुकीचे अहवाल देणाऱ्या खासगी लॅबमध्ये करोनासंदर्भात चाचणी करण्यास मनाई करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

काही खासगी लॅब सरकारी यंत्रणांना करोनाच्या संशयित रुग्णांचे अहवाल वेळेत देण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यांच्याकडून आलेले चाचणी अहवाल सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या लॅबमध्ये पुन्हा तपासले जात आहेत, असे सांगून टोपे म्हणाले , काही खासगी लॅबकडून वेळेत अहवाल मिळ‌त नाहीत. अहवाल देण्यासाठी सामान्यतः एक ते दोन दिवस घेतले जातात . कदाचित खासगी लॅबमध्ये किट्स उपलब्ध नसल्यामुळं तपासणीला विलंब होत असावा. नमुन्यांच्या तपासणीला अधिक कालावधी लागल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असे ते म्हणाले.



Comments



Leave a Comment



WhatsApp