प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही निवड केली आहे. आमदार ऋतुराज पाटील यांची युवक वर्गात मोठी क्रेझ आहे. सर्वांना सामावून घेऊन काम करण्याची त्यांची क्षमता आहे. त्यांच्या या कार्यशैलीचा राज्यात युवक काँग्रेसचे बांधणी करताना उपयोग होईल, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस पदी मधुकर नाईक, प्रेरणा वरपूडकर, नीरज लोणारे, निखिल कवीश्वर, निखिल कांबळे, सोनू लक्ष्मी घाग व अश्विनी आहेर यांचीही ही नियुक्ती करण्यात आली आहे.CommentsLeave a CommentWhatsApp