येत्या 24 तासात कोल्हापूरसह राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : कोरोना व्हायरसचे संकट गडद होत असतानाच येत्या 24 तासांत देशात अनेक भागांसह महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, ललितपूर, नागपूर, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 24 तासांत या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गुरुवारी कोकण किनापट्टीलगच्या काही भागांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. नाशिकमधील मनमाड शहर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. बदलत्या हवामानामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होईल . आधीच कोरोनामुळे व्यवसायात समस्या निर्माण झाल्या असताना आता अवकाळी पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.CommentsLeave a CommentWhatsApp