ब्रह्मचारी दिनेश मित्तल आणि खासदार संजय मंडलिक यांची खास भेट

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:

महर्षि युरोपियन रिसर्च युनिव्हर्सिटीचे ब्रह्मचारी दिनेश मित्तल आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांची खास भेट आज लक्ष्मीपुरी येथे पार पडली. या प्रसंगी झालेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये महर्षि महेश योगी यांचे देशविदेशातील जीवन कार्य आणि भावतीत ध्यान पद्धती यांची सखोल माहिती खासदार मंडलिक यांनी मित्तल यांच्याकडून घेतली. भावतीत ध्यानाच्या प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये आवश्यक मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आयुर्वेदाचार्य डॉ.सुनिल पाटील, अयोध्या बिल्डर्सचे नितीन पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुराडे, डॉ. ऋषिकेश जाधव आदी उपस्थित होते.CommentsLeave a CommentWhatsApp