खताची कृत्रिम टंचाई: खा संजय मंडलिक यांनी खत कंपन्यांना धरले धारेवर

कोल्हापूर: द फायर:प्रतिंनिधी: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 22 मार्चला जनता कर्फ्युपाठोपाठ लॅाकडाऊन जाहीर केल्याने देशात सर्व प्रकारची वाहतूक सेवा बंद झाली. परिणामी जिल्ह्यात खतांचा तुटवडा वाढत होता.  लॅाकडाऊन शिथील झालेनंतर वाहतूक सेवा सुरु झालेनंतर सहकारी संघांना खतांचा पुरवठा न करता खासगी डिलरना खतांचा पुरवठा खत उत्पादक कंपन्यांकडून केला जातो. आवश्यक त्या प्रमाणाप्रमाणे युरीयाचा पुरवठा केला जात नसल्यामूळे जिल्ह्यात युरीयाची कृत्रीम टंचाई झाली असल्याच्या कारणावरून खत उत्पादक कंपनी़च्या अधिका-यांना खासदार संजय मंडलिक यांनी शासकीय विश्रामधाम येथे आयोजित केलेल्या बैठकीत चांगलेच  धारेवर धरले.  यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, यांचेसह खत पुरवठा करणाऱ्या सुमारे अकरा कंपनीचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.  अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते. 

    यावेळी आमदार राजेश पाटील यांनी सहकारी संघांना खतांचा पुरवठा न करता खाजगी पुरवठादारांना खत पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी रेषोप्रमाणे युरीयाचा पुरवठा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सहकारी संस्था व खाजगी डीलर यांना समप्रमाणात युरियाचा पुरवठा करावा असे त्यांनी सांगितले. 

    सध्या, सिमेंटच्या रॅक रेल्वे फलाटावर लागून असल्यामुळे खतांच्या रॅक या कोल्हापूरात वेळेत उतरल्या जात नसल्याने परिणामी इतर ठिकाणी खत उत्पादक कंपन्या खत पुरवठा करतात असे ट्रान्स्पोर्टर विकास जाधव यांनी सांगितले.  याकरीता गुड मार्केट या रेक पॅाईंटवर असलेला रिस्ट्रिक्शन झोन उठवून रासायनीक खताच्या रेकला येण्यासाठी मार्ग मोकळा करणे आवश्यक असलेचे त्यांनी सांगितले.  याबैठकीस जिल्हा कृषी अधिक्षक वाकुरे यांचेसह जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी हेही उपस्थित होते.CommentsLeave a CommentWhatsApp