संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांना वेतनची चिंता

कोल्हापूर: प्रतिंनिधी:द फायर:

देशभरातील 'लॉकडाऊन'मुळे सर्व कामकाज ठप्प झाले असल्याने संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना मार्चमधील वेतन कसे मिळणार याची चिंता लागली आहे. कोल्हापूर परिसरात अशा कामगारांची संख्या लाखाच्या घरात आहे. नियमित एवढे वेतन मिळणार की सरकारी कर्मचार्‍याप्रमाणे कपात होणार? याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

 सरकारने कंपन्या, कारखानदारांना कामगारांच्या पगारात कपात करू नयेत असे आदेश दिले आहेत. सरकारी आदेशामुळे कामगारांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या नजरा मात्र कारखाना आणि कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे लागल्या आहेत. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणाऱ्या पगारावर घरचे बजेट अवलंबून असते. कोल्हापूर परिसरातील  शिरोली एमआयडी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि उद्यमनगर परिसरातील लहान-मोठे कारखाने मिळून एक लाख कामगारांची रोजीरोटी अवलंबून आहे. याशिवाय सूतगिरण्या, यंत्रमाग, लहान वस्तू उत्पादक कंपन्यामधील कामगारांसमोर वेतनाचा प्रश्न आहे. संघटित क्षेत्रातील कामगारांना, साधारणपणे दर महिन्याच्या पाच ते दहा तारखेच्या दरम्यान पगार होतो. काही ठिकाणी एक तारखेला पगार मिळतो. काही ठिकाणी रोखीने पगार मिळतो.

दरम्यान राज्य सरकारने, 'लॉकडाऊन' कालावधीत कामगारांना पगार देण्याविषयी स्पष्ट आदेश दिले आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये पाच ते दहा तारखेदरम्यान पगार होतो. जेथे रोख पगार होतो, तेथे जाऊन पगार घेण्यास कामगारांना पोलिसांनी परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही पगार वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही.असा इशारा श्रमिक महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी दिला आहे.CommentsLeave a CommentWhatsApp