बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाने 20 हजार रुपये द्यावेत : बी जी मांगले

कोल्हापूर:प्रतिंनिधी:द फायर:

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गेली महिनाभर बांधकाम व्यवसाय बंद पडला आहे.बांधकाम मजूर हा हातावरचे पोट असणारा आहे.कमवावे तेव्हाच खावे अशी परिस्थिती असते. पण कामे बंद असल्याने खायचे काय आणि जगावे कसे अशा चिंतेने त्याला ग्रासलेय . अशा कसोटीच्या क्षणी त्यांच्या हक्काच्या निधीतून म्हणजेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून किमान रुपये 20,000 एव्हढी रोख मदत करावी अशी मागणी या कामगारांचे नेते बी .जी. मांगले यांनी केली आहे.  

यामुळे शासनाच्या तिजोरीवर कोणताही भार पडणार नाही.ही  मदत नोंदीत व जीवित कामगारांच्या बँक खात्यावर जमा करावी .अशी मागणी मांगले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील ,ग्रामविकास मंत्री मुश्रीफ,मंत्री बच्चू कडू व आमदार चंद्रकांत जाधव यांना केली आहे. तशा मागणीचे पत्र पाठवले असून तात्काळ निर्णय घेण्याची विनंती केली आहे.CommentsLeave a CommentWhatsApp