जिल्ह्यात उद्या पासून बस,सलून,बांधकाम प्रकल्प,दुकाने,बँक,रिक्षा,मैदाने आदी सुरु होणार

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:  राज्य शासनाने नॉन रेडझोनमधील जिल्ह्यांसाठी जाहीर केलेले नियम अटीनूसार विविध उद्योग व व्यवसाय सुरु ठेवले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही उद्यापासून (ता. 22) अंतर्गत बससेवा, केशकर्तनालय, बांधकाम प्रकल्प, सलून, स्पा, सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने बॅंक नियम व अटींसह सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

काय सुरु राहणार :

जिल्हांतर्गत बससेवा (50 टक्के क्षमता)-केशकर्तनालय, सलून, स्पा-रिक्षा 1+2 प्रवासी (चालक आणि 2 प्रवासी)- चारचाकी1+2 प्रवासी(चालक आणि 2 प्रवासी)- मद्यविक्री- दुचाकी 1 जण- सरकारी कार्यालये- दुकाने 9 ते 5 पर्यंत- उद्योग, बांधकाम,जीवनावश्‍यक वस्तू, मालवाहतूक- मेडिकल, हॉस्पिटल- खासगी कार्यालये- बॅंक, कुरियर- ई- कॉमर्स दुकाने- घरपोच साहित्ये- आरटीओ, निबंधक ऑफिस- सर्व मैदाने ( फक्त वैयक्तिक व्यायाम करिता, सोशल डिस्टन्स ठेऊन करणे)

काय बंद राहणार :

प्रवास, रेल्वे, विमान, मेट्रो, आंतरराज्य रस्ते वाहतूक, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, हॉटले, मॉल, मंदिर, प्रार्थनास्थळ.



Comments



Leave a Comment



WhatsApp