कुंभार समाजातर्फे राजेश क्षीरसागर यांचा सत्कार

कोल्हापूर: द फायर:प्रतिंनिधी: प्लास्टर ऑफ पैरिस मूर्ती वरील बंदिला स्थगिती द्यावी, यासाठी केंद्र शासनास शिफारस करावी.  अशी यशस्वी मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली होती. सदर मागणी केंद्र शासनाने मंजूर केली आहे. त्याचा यशस्वी पाठपुरावा केल्या बद्दल महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ तथा कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समिती यांच्या वतीने  राजेश क्षीरसागर यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुंभार समाज अध्यक्ष माजी महापौर मारुतीराव कातवरे, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश कुंभार, सचिव डी. डी. कुंभार, युवाध्यक्ष सतीश बाचनकर, बबनराव वडनगेकर, संभाजी माजगावकर, संभाजी ठाणेकर, प्रकाश तारळेकर, अनिल निगवेकर, प्रा.निवास कुंभार, आर. जी. कुंभार आदी उपस्थित होते.CommentsLeave a CommentWhatsApp