कोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक सदृश्य स्थितीः मनपाचा उपशहर नगर रचनाकार पॉझिटिव्ह,टीपी विभाग सील

कोल्हापूरःद फायरःप्रतिनिधीः कोल्हापुरात कोरोनाव्हायरसची हळुहळु उद्रेक सदृश्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे .दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत आहे. या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्याही धोकादायक पातळीवर पोहोचली आहे .दरम्यान महानगरपालिकेच्या टीपी विभागातील एक उप शहर नगर रचनाकार अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे राजारामपुरी येथील विभागीय कार्यालयातील टीपी विभाग सील करण्यात आला आहे .तसेच या विभागातील अभियंते सर्व प्रकारचे कर्मचारी होम विलगीकरण झाले आहेत. या अधिकाऱ्याचे कर्मचारी तसेच अनेक बांधकाम व्यवसायिक यांच्याशी संपर्क असल्याने खळबळ उडाली आहे

या अधिकाऱ्याने कसबा बावडा येथील अंडी उबवणी केंद्र तसेच सैनिक दरबार हॉल मधील कोविद सेंटरच्या उभारणीत चांगले काम केले आहे. कार्यालयात तसेच कोरोना विरोधी लढाईतील कार्यात या अधिकाऱ्याचा अनेकांची गेल्या काही दिवसात संपर्क आला असल्याचे समजते. त्यामुळे टीपी विभागासह अनेक बांधकाम व्यावसायिक ही हादरले आहेत .टीपी विभागातील सर्व प्रकारचा स्टाफ होम कवारंटाईन झाला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येतील वाढ शुक्रवारी कायमच राहिली .काल रात्री पर्यंत 166 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .सीपीआरमधील तपासणी केंद्रातील किटस संपल्याने काल तपासणीचे काम रखडले होते. त्यामुळे अनेक रुग्णांचे स्वब घेऊनही त्याचे अहवाल प्राप्त न झाल्याने शुक्रवारी रुग्ण संख्येतील वाढ कमी दिसते आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे .जिल्ह्यात सीपीआर मधील दोन ,हिवताप विभागातील एक तसेच खाजगी रुग्णालयातील दहाहून अधिक डॉक्टरही पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात नव्या रुग्णावर उपचार करण्यात आरोग्य विभागाची यंत्रणा हळूहळू तोकडी पडू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 6 हजार 274 वर गेली आहे तर आतापर्यंत 186 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजारहून अधिक रुग्णावर उपचार सुरू आहेत तर बरे झाल्याने 2 हजार 736 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.CommentsLeave a CommentWhatsApp