अक्षम्य बेफिकिरी; कोरोना बाधित महिला व तिच्या दोन मुलांना आराम कॉर्नरला घरीच ठेवले होते होम क्वारंटाईन

कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: प्रशासनाच्या अक्षम्य बेफिकिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईहून आलेली एक महिला व तिच्या दोन मुलांना आराम कॉर्नर परिसरातील घरीच होम क्वारांटाईन करण्यात आले होते. काल गुरुवारी रात्री उशिरा या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हडबडलेल्या प्रशासनाने आज शुक्रवारी सकाळी परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मात्र आजूबाजूचे नागरिक तसेच स्थानिक नगरसेवकाने मुंबईहून आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोंनाची प्राथमिक लक्षणे दिसतात. त्यांना संस्थात्मक विलगीकरण करा, अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

परिणामी अत्यंत दाटीवाटीची वस्ती असलेल्या आराम कॉर्नर परिसरात आता भीतीचे सावट पसरले आहे. एक महिला व तिची दोन मुले चार दिवसापूर्वी मुंबईहून आराम कॉर्नर परिसरातील घरी राहावयास परतले. तेव्हाच आजूबाजूच्या नागरिकाने प्रशासनाला याची कल्पना दिली. स्थानिक नगरसेवक ईश्वर परमार यांनीही या कुटुंबाला संस्थात्मक विलगीकरण करावे, अशी मागणी केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन दिवसापूर्वी या तिघांचे घशातील स्वबचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा काल रात्री अहवाल आला. तो पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले. ही महिला व तिच्या मुलांना तात्काळ सीपीआरमधील कोरोनाव्हायरस बाधित रुग्णांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षात हलविण्यात आले.

 परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या कुटुंबाला होम अलगीकरण करण्यात आले होते. आता प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे आराम कॉर्नर परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा परिसर अत्यंत दात वस्तीचा आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसची बाधा झालेल्या महिला व तिच्या मुलांच्या संपर्कात आलेल्या तसेच परिसरातील नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 226 गेली आहे. जिल्ह्यात आता कोल्हापूर शहरासह सर्व तालुक्यात रोगाचे रुग्ण आढळू लागले आहेत. दिवसेदिवस त्यात वाढ होत चालली आहे. काल गुरुवारी एका दिवसात 46 नवे रुग्ण सापडले. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक एकूण 70 रुग्ण असून त्यापाठोपाठ राधानगरी तालुक्यात 35 रुग्ण आहेत. भुदरगड तालुक्यात कोरोनाव्हायरसची आतापर्यंत 22 जणांना बाधा झाली आहे. चंदगड- 13 आजरा- 11 पन्हाळा- 13 गडहिंग्लज- 5 तसेच कोल्हापूर महापालिका हद्दीत 19 व करवीर तालुक्यात 11 रुग्ण आढळले आहेत. बहुसंख्य बाधित रुग्ण हे मुंबईहून परतलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp