जयसिंगपूरात आज दिवसभरात दोन कोरोनोग्रस्त

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी:  आज शहरातील तिसऱ्या गलीत राहणारे पेट्रोल पंप व्यवसायिक आणि 12 व्या गल्लीतील  एका माजी नागराध्यक्षांचे पती अशा दोघांना आज कोरोनोची लागण झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे जयसिंगपूरात गेल्या काही दिवसात कोरोनो ग्रस्त रुग्णांची संख्या 80 झाली आहे अशी माहिती जयसिंपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.पांडुरंग खटावकर यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले आज आढळलेल्या व्यक्तीस आगर येथील कोव्हीड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आज आढळलेले दोघे नवीन रुग्ण आहेत त्यांना गेले चार दिवस थोडा त्रास जाणवू लागला होता म्हणून त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन बरे होऊन  घरी आले पण शंका नको म्हणून त्यांनी स्वब दिला होता तर दुसरे रुग्ण बरे नाही म्हणून कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांनीही स्वब दिला होता. आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेही डॉ.पांडुरंग खटावकर यांनी सांगितले.

या दोघा रुग्णांच्या घरातील लोकांना आगर आणि अतिग्रे येथील कोव्हीड केंद्रात पाठवण्यात आले आहेत असेही डॉ.पांडुरंग खटावकर यांनी सांगितले.

दरम्यान 12व्या गल्लीतील कोरोनाबधित रुग्ण असलेला  परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून याठिकाणी पालिकेतर्फे औषध फवारणी आली आहे असे मुख्याधिकारी टीना गवळी यांनी सांगितले.

दरम्यान गेल्या काही दिवसात सलगपणे आढळून आलेल्या जयसिंगपूरातील रुग्णांची संख्या 80 झाली आहे तर तीघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.CommentsLeave a CommentWhatsApp