‘जनता कर्फ्यू’ची जय्यत तयारी, शनिवारीच खवयांची मटण,मासे आणि मद्य खरेदीसाठी कोल्हापूरात झुंबड

कोल्हापूर:प्रतिंनिधी:द फायर:  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला म्हणजे येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं. लोकांनी सकाळी ७ ते रात्री दहा वाजेपर्यंत घराबाहेर निघू नये असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याला कोल्हापूरकर उत्फूर्त पाठींबा देणार आहेत. खवय्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरकरांनी ‘जनता कर्फ्यू’ची जय्यत तयारी शनिवारपासूनच सुरु केली आहे. शनिवारी दुपारपासूनच कोल्हापूरकरांनी मटण, चिकन, मासे खरेदी सुरु केली आहे त्यामुळे या दुकानासह मद्य खरेदीसाठी वाईन शॉपवर झुंबड उडाली असून लांबच लांब रंग लागल्याचे सर्वत्र दृश्य आहे.

उद्याच्या बंद मध्ये सर्व दुकाने, कारखाने, व्यवहार बंद राहणार आहेत. यामध्ये मटण, चिकन, मासे अंडी या दुकानाचही समावेश आहे. रविवार हा कोल्हापुरी खवय्यांचा महत्वाचा दिवस. त्या दिवशी मटण मासे तांबडा पंधरा पाहिजेच. हा प्रघात काही केल्या तुटता कामा नये. म्हणून कोल्हापूरकरांनी मटण, चिकन, मासे खरेदी सुरु केली आहे त्यामुळे या दुकानासह मद्य खरेदीसाठी वाईन शॉपवर प्रचंड गर्दी केली असून लांबच लांब रंग लागल्याचे सर्वत्र दृश्य होते. अर्थात हा चर्चेचाही विषय झाला होता. ‘जनता कर्फ्यू’ला कोल्हापुरात उत्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनता कर्फ्यू’ला पाठिबा देण्याबाबत शनिवारी शहरात अनेक ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून आवाहन करण्यात येत होते.            

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा ‘जनता कर्फ्यू’मध्ये फक्त अंशत:च सुरू राहणार आहे. तर सर्व पॅसेंजर ट्रेन्स २४  तास बंद राहतील. एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे अनावश्यक प्रवास थांबविण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने आतापर्यंत २४५ गाड्या रद्द केल्या आहेत. देशभरात २४०० प्रवासी गाड्या आणि १३०० मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावतात. आता रविवारी या ३७०० गाड्यांचे आधीच केलेलं बुकिंग रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाचा संपूर्ण परतावा देण्यात येईल. सरकारच्या आदेशानुसार प्रीपेड गाड्यांमध्ये अन्नपुरवठा करणार्‍या स्टेशनरी युनिट्स चालू असणार आहेत. मात्र मेल एक्स्प्रेस गाड्यांची आणि ट्रेन साइड वेंडिंग (टीएसव्ही) गाड्यांची खाद्य सेवा बंद केली जावी. जीवनाश्यक वस्तुंच्या दुकानाव्यतिरिक्त इतर दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहे.  जनता कर्फ्यू’ दिवशी खाद्य पदार्थांची दुकानेही बंद असण्याची शक्यता आहे.  औषधांची दुकाने मात्र यावेळी खुली असतील. मात्र नागरिकांनी गरज असल्यासचं बाहेर पडावे.असे आवाहन करण्यात आले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp