कोरोनाशी लढण्यासाठी जॅक मा यांची आशिया आणि आफ्रिकेतील देशांना मोठी मदत

नवी दिल्ली: आशियातील सर्वाधिक श्रीमंत अलिबाबाडॉटकॉम या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आशिया आणि आफ्रिकेतील देशांना ७२ लाख मास्क, १२ लाख कोरोना टेस्ट किट आणि इतर वस्तूंचा पुरवठा केला आहे.

जॅक मा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कोरोनाला रोखण्यासाठी विविध देशांना दिलेल्या मदतीची माहिती दिली आहे. अफगाणिस्तान, बांग्लादेश, कंबोडिया, मालदीव, मंगोलिया, पाकिस्ता, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार यासह इतर देशांना जॅक मा यांनी १८ लाख मास्क, २ लाख १० हजार कोरोना टेस्ट किट, ३६ हजार प्रतिबंधात्मक सूट्स पुरवली आहेत.

याशिवाय जॅक मा फाउंडेशनच्या माध्यमातून आफ्रिकेतदेखील ५४ देशांना प्रत्येकी २० हजार टेस्ट किट, १ लाख मास्क आणि १ हजार सूट्स पुरवण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात जॅक मा यांनी अमेरिकेलाही मोठी मदत केली होती. जॅक मा फाउंडेशन आणि ट्विटर यांनी ५ लाख टेस्ट किट आणि १० लाख मास्क डोनेट केले होते.CommentsLeave a CommentWhatsApp