दिल्लीतील 21 जण आणि जिल्ह्यात परतलेले 10 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात : नागरिकांनी घाबरु नये- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर: प्रतिंनिधी:द फायर: धार्मिक कार्यक्रमासाठी दिल्लील्या गेलेल्या 21 जणांना दिल्लीमध्येच संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अन्य 19 जणांना पैकी जिल्ह्यात परतलेल्या 10 जणांची तपासणी करुन त्यांनाही संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. उर्वरीत 9 जणांनाही दिल्ली, हरियाणा अशा ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

        दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या जिल्ह्यामधील 21 जणांना दिल्ली शासनाने तेथेच संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवले आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, केंद्र शासनाकडून अन्य 21 जणांची यादी पाठवली होती. यामध्ये छाननी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली. त्यामुळे जिल्ह्यातील 19 जणांचा समावेश आहे. पोलीस यंत्रणेने या सर्वांच्या ठिकाणांचा शोध लावला. यातील 10 जण यापूर्वीच जिल्ह्यात आलेले असून त्यांची तपासणी करुन त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या मधील उर्वरीत 9 जण जिल्ह्याबाहेर आहेत.

      त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. अजूनही जर पर जिल्ह्यातून पर राज्यातून आले असतील आणि कोणतीही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी तात्काळ आरोग्य केंद्रात जावून वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे ही त्यांनी सांगितले.CommentsLeave a CommentWhatsApp