अभियांत्रिकी सीईटी परीक्षा देण्यासाठी अर्ज करण्यास १ जूनपर्यंत मुदतवाढ

जयसिंगपूर:द फायर:प्रतिंनिधी:  राज्यातील अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षा अर्थात प्रवेश परीक्षेसाठी ज्यांनी अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी येत्या १जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सीईटी सेलचे डॉ.एस.के.महाजन यांनी आज दिली.

त्यांनी सांगितले की अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी 2020 परीक्षा देण्यासाठी अर्ज करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सातत्याने राज्य शासनाकडे केल्याने राज्य शासनाने अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्यांनी अद्याप या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरलेले नाहीत अशा १२वी सायन्स परीक्षा दिलेले विद्यार्थी नव्याने अर्ज करू शकतील.त्यासाठीची लिंक उद्यापासून उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी या लिंकवर जाऊन आपला अर्ज आणि शुल्क भरावयाचे आहे.त्यासाठी सीईटी सेलच्या वेबसाईटला भेट द्यावी असेही आवाहन डॉ.महाजन यांनी केले आहे.

आतापर्यंत ५लाख २४ हजार ९०७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले असून ही परीक्षा ४ ते १४ जुलै आणि २८ ते ५ ऑगस्ट अशा दोन टप्प्यात होणार आहे असेही डॉ.महाजन यांनी सांगितले.CommentsLeave a CommentWhatsApp