ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन रजिस्ट्रेशन आदीसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली: ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांचे रजिस्ट्रेशन, पीयूसी प्रमाणपत्र आदी कामासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायाबरोबरच सरकारी कार्यालये बंद झाली. त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा ही समावेश आहे. आता लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे अनेकांची ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याची मुदत संपली आहे. वाहनांचे रजिस्ट्रेशन व्हावयाचे आहे. पीयूसी प्रमाणपत्रांची मुदत संपली आहे. अशी अनेक आरटीओ कार्यालयाशी निगडित कामे होऊ शकलेली नाहीत. ही कामे करण्यासाठी याआधी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. वाढीव मुदतीत प्रलंबित कामे करावयाची झाल्यास त्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही, असेही श्री नितिन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp