अमेरिकेत करोनाची स्थिती गंभीर बळींची संख्या पाच हजारांवर

वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने पाच हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. बुधवारी, एक एप्रिल रोजी एक हजारजणांचा मृत्यू झाला असून २६ हजारहून अधिक नवे रुग्ण आढळले.

अमेरिकेत बुधवारी, २६ हजार ४७३ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे आढळले. तर, १०४९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील एकूण मृतांची संख्या ही ५१०२ इतकी झाली असून दोन लाख १५ हजारजणांना करोनाची बाधा झाली असल्याची आकडेवारी 'वर्ल्डोमीटर'ने दिली आहे. अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव न्यूयॉर्कमध्ये झाला आहे. न्यूयॉर्क राज्यात बुधवारी करोनाबाधितांची संख्या ८३ हजार ९०१ इतकी झाली. तर, एकूण २२१९ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ५०५ मृतांची नोंद करण्यात आली. न्यूयॉर्कनंतर न्यूजर्सीमध्ये ही करोनाचा कहर सुरू आहे. न्यूजर्सीत करोनाचे २२ हजार २५५ रुग्ण आढळले आहेत. तर ३५५ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे एका सहा आठवड्याच्या लहानग्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील परिस्थिती चिघळत असून प्रशासनाकडून संसर्गाच्या नियंत्रणासाठी पावले उचलली जात आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील आगामी ३० दिवस महत्त्वाचे असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले होते.CommentsLeave a CommentWhatsApp