देशाबरोबरच महाराष्ट्रातही कोरोनाबाधित संख्येत वेगाने वाढ

मुंबई: देशाबरोबरच महाराष्ट्रातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. आजही राज्यात 3 नवे रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात 2 तर बुलडाण्यात एक रुग्ण आढळला. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 वर पोहोचली आहे.

बुधवारपर्यंत ही संख्या 335 वर होती. चिंतेची बाब म्हणजे, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली होती. त्यातच आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहे. तर बुलडाण्यात आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.CommentsLeave a CommentWhatsApp