एकाच दिवसातील तीन मृत्यूमुळे मंत्री हसन मुश्रीफ तडक पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयात: मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आढावा बैठक

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी:

शुक्रवार दिनांक १० जुलै २०२० रोजी एकाच दिवशी झालेल्या तीन कोरोणा बाधिताच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तडक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तसेच तातडीने पालकमंत्री सतेज पाटीलही जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. वाढत चाललेल्या कोरोणाबाधितांच्या संख्येमुळे तातडीने या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सवरून बोलताना मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, सर्वेमधून लवकरात लवकर रुग्न शोधा आणि लवकरात लवकर उपचाराखाली आणा. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील कोदड केअर सेंटर आणि दवाखाने व एस टी ट्युशन अल्कोर टाईम साठी इमारती तयार ठेवा. पुरेसा औषध साठा व यंत्रसामुग्री ही अद्ययावत ठेवा . यामध्ये काही अडचणी आल्यास तातडीने फोनवरून संपर्क साधा, अशा सूचनाही श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. शहरांबरोबरच ग्रामीण भागात वाढत चाललेले कम्युनिटी स्प्रेडिंग चिंताजनक असल्याचे, ते म्हणाले. श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील ग्रामदक्षता समित्यांसह ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, आरोग्य विभाग, तहसीलदार या सगळ्यांनी मास्क वापरण्याबद्दल प्रबोधन करा. मास्क वापरत नाही त्यांच्यावर केवळ शंभर रुपयांच्या दंडासारखी तुटपुंजी कारवाई न करता, कठोरातील कठोर कारवाई करा.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कम्युनिटी स्प्रेडीग थांबवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. लक्षणे दिसताच तातडीने स्वॅब घेऊन, तातडीने उपचार सुरू व्हायला पाहिजेत. जे सर्वे झालेले आहेत, त्यांचे विश्लेषण करून आपापल्या पातळीवर त्यानुसार काम व सुधारणा करा.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू होणार नाही, हे आपले उद्दिष्ट आहे. ईली आणि सारी रोगाचे जरी रुग्ण असले तरी आधी त्यांचे स्वॅव घ्या, अशा सूचना दिल्या.

आपल्या घरातील माणूस समजा.....

श्री मुश्रीफ म्हणाले कोरोना संसर्गाची लढताना जे जे काही करावे लागेल त्यामध्ये येणाऱ्या तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू. दुर्दैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याचीकाळजी घ्या. मृत्यू झालेला तो रुग्ण आपल्या घरातील माणूस समजा आणि बाधित रूग्णांवर उपचार करा, असे श्री मुश्रीफ म्हणाले.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमन मित्तल, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते

 CommentsLeave a CommentWhatsApp