'कॉमन मॅन' देणार रिक्षाचालकांना रुमाल

कोल्हापूर : द फायर – प्रतिनिधी:

कोरोना विषाणूंची साथ रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण ५२ वरून ६३ पोहोचली आहे. उद्या रविवारी जनता कर्फ्यू पुकारला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कॉमन मॅन संघटनेने सोमवारी प्रत्येक रिक्षा व्यावसायिकास एक रुमाल जो मास्क म्हणून वापरता येईल, असा रुमाल देणार आहे. संघटनेचे प्रमुख ॲड. बाबा इंदुलकर यांनी ही माहिती दिली.

गेल्या तीस वर्षांपेक्षा जास्त काळ शहरातल्या तीन आसनी रिक्षांनी जनतेला सेवा पुरवली आहे. ऊन, पाऊस, थंडी, पूर याची तमा न बाळगता जनतेला सेवा पुरवण्यामध्ये रिक्षाचालक मग्न राहिला आहे. दिवसरात्र ओळखीच्या-अनोळखी आजारी पेशंट यांना सेवा पुरविण्यासाठी कार्यरत राहताना या घटकाला या विषाणूपासून धोका संभावतो. म्हणून रिक्षा व्यावसायिकाला त्यातून सुरक्षित ठेवण्यासाठी कॉमन मॅनने सोमवारी प्रत्येक रिक्षा व्यावसायिकास एक रुमाल जो मास्क म्हणून वापरता येईल व तो रुमाल दुसऱ्या दिवशी पुनर्वापर करता येणार आहे. सोमवारी सकाळी अकरापासून कॉमन मॅनचे कार्यकर्ते प्रत्येक स्टॉपवर जाऊन रिक्षा व्यावसायिकाला हा रुमाल मोफत देणार आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp