भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कुटुंबियासह काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन

कोल्हापूर :द फायर:प्रतिंनिधी:  कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे आज शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात सहभाग नोंदविला.त्यांनी आपल्या निवासस्थानासमोर हातामध्ये मागण्यांचा फलक धरून काळे मास्क घालून आंदोलन केले.

हातावर पोट असणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ५० हजार कोटी रूपयांच्या पॅकेज देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या आंदोलनात  त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. अंजली, आई सरस्वती बच्चू पाटील, सासुबाई शुभदा खरे, मोहन मेने आदी सहभागी झाले.

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी भाजपच्या शहर कार्यालया समोर आंदोलन केले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला.



Comments



Leave a Comment



WhatsApp