लोणावळ्याजवळ बर्निंग ट्रकचा थरार; चालकाचा होरपळून मृत्यू

लोणावळा : द फायर – प्रतिनिधी: मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ट्रकचालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्घटना लोणावळा येथील वरसोली टोल नाक्याच्याजवळ घडली आहे. या घटनेमुळे पहाटेच्या सुमारास हायवेवर बर्निंग ट्रकचा थरार पहायला मिळाला. सुनील हनवते (वय ३०, रा. तळेगाव दाभाडे) असे ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हनवते जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा येथील वरसोली टोल नाक्याच्याजवळून ट्रक घेऊन जात होते. पहाटेच्या सुमारास अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ट्रक चालक हनवते यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गावर वाहनांना लागलेल्या आगीच्या दोन घटना घडल्या. मुंबईहून पुण्याकडे भांडी घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे माडप गावाजवळ आग लागल्याने दुसरा चालक गंभीर जखमी झाले आहे.CommentsLeave a CommentWhatsApp