रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात; कर्जाचा हप्ता न भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली

नवी दिल्ली: करोनामुळे जगभरातील आर्थव्यस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत दिली. या रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे.

रेपो रेटमध्ये ४० बेसिक पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे.रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के कायम राहणार आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे.

औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मार्चअखेरीस 17टक्क्यांची घट तर उत्पादनात 21टक्यांची घट झाली असून मुलभूत उद्योगातील उत्पादनात 6.5% टक्क्यांची घट झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याच्या उत्पादनात 3.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे ही दिलासादायक गोष्ट आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे असे शक्तीकांत दास यांनी सांगितले.

कर्जाचा हप्ता न भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली

- RBI ने कर्जाचा हप्ता न भरण्याची मुदतआणखी तीन महिन्यांनी 1 जुने ते 31 औगस्ट पर्यंत वाढवून कर्जदारांना दिलासा दिला आहे.

-परकीय गंगाजळी वाढवण्यासाठी EXIM बँकेला 15000 कोटीचा निधी देणार.

-2020-21मध्ये परकीय गंगाजळीत 9.2 बिलियनने वाढ. 15 मे पर्यंत एकूण परकीय गंगाजळी 487 बिलियन डॉलर इतकीआहे.

-केंद्रीय बँका या पारंपरिक विचारसरणीच्या समजल्या जातात.पण अशा संकटकाळी या बँकाच विविध उपाययोजना करण्यात आघाडीवर असतात.CommentsLeave a CommentWhatsApp