उद्या जनता कर्फ्यूः ३, ७०० रेल्वे आणि १००० उड्डाणे रद्द

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी २२ मार्चला १४ तासांच्या जनता कर्फ्यूचे देशवासियांना आवाहन केले आहे.या पार्श्वभूमीवर  भारतीय रेल्वेने रविवारी ३, ७०० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच इंडिगो, गोएअर या विमान कंपन्यांनी १ हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांनी या कालावधीत जनतेने घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.त्यामुळे रेल्वेनेही २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

२१/२२ मार्च मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २२ तास एकही रेल्वे चालवण्यात येणार नाही. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी गाड्यासाठी रेल्वेने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा रेल्वे आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp