पंतप्रधान का शांत आहेत, आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? – राहुल गांधी यांचे नरेंद्र मोदी यांना सवाल

नवी दिल्ली: लडाखच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात अचानक सघर्ष उडाला . त्यात भारताचे किमान २० जवान शहीद झाले. या घटनेमुळे एकीकडे सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. गलवाण खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली?,” असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणा केली आहे की , “पंतप्रधान का शांत आहेत?, ते काय लपवत आहेत? आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?,” असे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp