भाजप खा. दुष्यंत सिंह यांच्या भेटीनंतर राष्ट्रपती कोविंद करुन घेणार कोरोना तपासणी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस हा राष्ट्रपती भवनपर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील स्वत:चं चेकअप करुन घेणार आहेत. भाजपचे खा. दुष्यंत सिंह यांच्यासोबतच्या भेटीनंतर राष्ट्रपती भवनमधील सूत्रांनी माहिती दिली आहे की, राष्ट्रपती देखील चेकअप करुन घेणार आहेत. या सोबतच राष्ट्रपतींचे इतर नियोजीत कार्यक्रम देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात जेव्हा नाश्तासाठी काही जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं तेव्हा खा. दुष्यंत सिंह देखील उपस्थित होते.

खा. दुष्यंत सिंह कोरोना पॉजिटिव्ह आहेत. बॉलिवुडची गायिका कनिका कपूरच्या लखनऊ येथील एका पार्टीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला वेगळं करुन घेतलं होतं. सोबतच त्यांची आई आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे या देखील इतरांपासून लांब झाल्या आहेत. कनिका कपूरच्या पार्टीत सहभागी झाल्याच्या ३ दिवसानंतर खा. दुष्यंत सिंह १८ मार्चला राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील खासादारांना राष्ट्रपती भवन येथे नाश्तासाठी आमंत्रित केलं होतं.

या कार्यक्रमाचा फोटो ही समोर आला आहे. ज्यामध्ये दुष्यंत सिंह हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मागे उभे आहेत. पण राष्ट्रपतींनी या दरम्यान त्यांना हात मिळवला नसल्याचं राष्ट्रपती भवनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील पार्टीत सहभागी झाल्याचं म्हटलं आहे. आपला मुलगा दुष्यंत सिंह यांच्यासह त्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. दोघे ही नेते आता सेल्फ-आइसोलेशनमध्ये आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp