रिलायन्सच्या जिओत पाचवी मोठी गुंतवणूक; केकेआरने खरेदी केले 11,367 कोटींचे शेअर्स

मुंबई: द फायर: प्रतिनिधी: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये परदेशातून होणारा गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. आता अमेरिकेतील केकेआर या खाजगी गुंतवणूक कंपनीच्या डिजिटल युनिटने रिलायन्स जिओमध्ये 1.5 बिल्लियन डॉलरची गुंतवणूक करत 2.3 3 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. भारतीय चलनात ही गुंतवणूक 11 हजार 367 कोटी रुपयांची आहे आतापर्यंत रिलायन्स जिओमध्ये गेल्या काही आठवड्यात 78 हजार 562 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याआधी फेसबूक, सिल्वर लेक, व्हीस्टा इक्विटी पार्टनर व जनरल अटलांटिक या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.CommentsLeave a CommentWhatsApp