धक्कादायक : तब्लिगी जमातमुळे 9000 लोकांना कोरोनाचा धोका

नवी दिल्ली: देशभर लॉकडाउन असताही निजामुद्दीनमध्ये झालेल्या तब्लिगी परिषदेतने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या परिषदेमुळे सुमारे 9 हजार लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. या परिषदेस किमान 7 हजार 600 भारतीय आणि 1 हजार 300 परदेशी लोक उपस्थित होते असा अंदाज आहे.

जमातने गेल्या महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आता हा कार्यक्रम भारतातील कोरोनाव्हायरसचे केंद्र झाले आहे. तब्लिगी जमातमधील सदस्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाल्यामुळे सदस्यांची संख्याही वाढू शकते. देशातील 1 हजार 306 सदस्यांची ओळख पटली आहे. गृहमंत्रालयाने एकत्रित केलेल्या माहितीनुसार 1 एप्रिलपर्यंत 1 हजार 051 लोकांना अलग ठेवण्यात आले आहे. 21 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. 



Comments



Leave a Comment



WhatsApp