लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे: पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी

कोल्हापूर : द फायर: प्रतिंनिधी: आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी प्रसंगी राज्याचे  गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील, यांनी  आदरांजली वाहिली.

याप्रसंगी बोलताना कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी केली. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळत सदर कार्यक्रम झाला. यावेळी कोल्हापूर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य गुलाबराव घोरपडे,माजी महापौर मारुतीराव कातवरे, जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार (वाईकर), माजी नगरसेवक सचिन चव्हाण,माजी नगरसेवक राजू साबळे,सौ,चंदा बेलेकर,किरण मेथे, उमेश पोर्लेकर, रणजित पोवार,संग्राम गायकवाड,सौ,मांढरे,आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.CommentsLeave a CommentWhatsApp