कोरोना पॉझिटीव्ह कनिका कपूरवर गुन्हा दाखल,संपर्कातील ४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

नवी दिल्ली : कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहीती लपल्याच्या आरोपावरून बॉलिवुडची गायिका कनिका कपूरवर शुक्रवारी रात्री लखनऊच्या सरोजनी नगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कनिकासोबत संपर्कात आलेल्या ५०  नेत्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी ४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठ दिलासा मिळाला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने ती उपस्थित असलेल्या सर्व पार्ट्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्ट्यांमध्ये कोण उपस्थित होते? या पार्ट्या कुठे झाल्या? याचा अहवाल २४ तासात प्रमुख गृह सचिवांना देण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. बॉलिवुडची गायिका कनिका कपूरवर कोरोना असल्याची माहिती लपवल्याचा आरोप होत असून तिला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कनिका कपूरचे कोरोना प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी मोठे निर्णय घेतले. कनिका लखनऊमध्ये ती ३-४ पार्ट्यांमध्ये होती. कानपूर देखील गेली. दरम्यान चारशे जणांच्या संपर्कात आली. लखनऊ ती ज्या पार्टीत होती ती राजकीय पार्टी होती. यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, त्यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह तसेच उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह देखील होते. अनेक नेत्यांचे कुटुंब देखील इथे होते. आता वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. पण कोरोनाची ही साखळी बनत चालली आहे. कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या राजकीय नेत्यांसहित शेकडो व्यक्ती पार्टीला गेल्या नसत्या आणि त्यांनी समजदारी दाखवली असती, स्वत: पार्टीला न जाता इतरांनाही यापासून रोखले असते. तर आज लखनऊ पासून संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत भीतीचे सावट पोहोचले नसते.

आता कनिकाला आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्या पार्टीमध्ये कोणकोण सहभागी झाले होते आणि त्यांची मेडिकल कंडिशन काय आहे, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, कनिकासोबत संपर्कात आलेल्या ५० नेत्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी ४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. खा. दुष्यंत सिंह, माजी मुख्य मंत्री वसुंधरा राजे याचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठ दिलासा मिळाला आहे. यात लखनऊचे काही मंत्रीही होते. त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.CommentsLeave a CommentWhatsApp