खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नको;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

मुंबई: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 21 दिवस 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासगी क्षेत्रातील कामगार आणि कर्मचारी यांच्या पगार कपात करू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासन निर्णय जारी केला आहेत. 31 मार्च रोजी राज्य शासनाकडून त्या संदर्भात पत्रक काढून आदेश जारी करण्यात आला. खासगी कंपन्यांच्या कामगारांच्या वेतनात कपात केली जाऊ नये असं आवाहन कंपनीच्या अध्यक्ष, मालकांना केलं आहे. राज्य सरकारचा हा आदेश निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्य, व्यापरी वर्गांसाठी लागू करण्यात आला आहे.CommentsLeave a CommentWhatsApp