३०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत; लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती

नवी दिल्ली: सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आज शनिवार मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी सांगितले, सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. आज सकाळी लष्कराने नौगाम सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून मॅगझिन. एक पिस्तुल, हातगोळे आणि दोन एके असॉल्ट रायफल्स जप्त केले. तसेच भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील दीड लाख रूपयेदेखील जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सर्वच क्षेत्रात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.CommentsLeave a CommentWhatsApp