आषाढी वारी : माऊलीच्या पालखी सोहळ्याचे विश्वस्तांचे शासनाला तीन प्रस्ताव, वारीसाठीचा आराखडाही सादर

पुणे : कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा  प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. याबाबत माऊलीच्या पालखी सोहळ्याबाबत विश्वस्तांनी शासनाला आता तीन नवे प्रस्ताव दिले आहेत. तसेच 2020 च्या वारीचे स्वरुप कसे असावे याबाबतचा आराखडा देखील शासनाला दिला आहे.  यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय मानाच्या पालखी आयोजकांनी नुकताच घेतला आहे.

 आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय  घेतला आहे. आता विश्वस्तांनी तीन प्रस्ताव वारीबाबत दिले आहेत.

 

असे आहेत तीन प्रस्ताव

1.श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणार्‍या प्रत्येक दिंडीतील एका विनेकऱ्यासह सुमारे 400 वारकर्‍यांसह नेहमीच्या पध्दतीने श्री माऊलींच्या चल पादुका रथामध्ये विराजमान करुन सर्व वैभवासह सोहळा पार पाडणे.

2.वारकरी एकंदर केवळ 100 व्यक्तींसह माऊलींच्या चल पादुका रथामध्ये विराजमान करुन सर्व वैभवासह सोहळा पार पाडणे.

3.वारीची परंपरा खंडीत होऊ नये या दृष्टीने पायी प्रवास न करता श्री माऊलींच्या चल पादुका वाहणामध्ये श्री क्षेत्र पंढरीस घेऊन जाऊन 30 व्यक्तींसह सोहळा पार पाडणे.

 CommentsLeave a CommentWhatsApp