जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 409 वर सायंकाळपर्यंत नवे 69 पॉझिटिव्ह रिपोर्ट

कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेच आहे. आज दुपारपर्यंत ही संख्या 400 चा टप्पा ओलांडून चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. सकाळी 31 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दुपारी आणखी 37 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दोन टप्प्यात आलेल्या अहवालात रुग्णांची संख्या 69 ने वाढून 409 पर्यंत गेली आहे. त्यामुळे प्रशासन हडबडून गेले आहे.

एका बाजूला अशी चिंताजनक स्थिती असताना आज कोल्हापुरातील तिघेजण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यात शाहूवाडी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. मानगाव येथील वीस वर्षाचा तरुण आणि केर्ले येथील वीस वर्षाचा तरुण तसेच पन्हाळा तालुक्यातील तीस वर्षाचा तरुण कोरोंना मुक्त झाला आहे.CommentsLeave a CommentWhatsApp