गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक 8380,राज्यात 2940 कोरोना रुग्णांची वाढ

मुंबई : देशात गेल्या 24 तासात 8380 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 193 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्णांची संख्या 1 लाख  82 हजार 143 झाली आहे. आता पर्यंत 5164 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86,983 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 4613 कोराना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 47.75 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाचे लागण अॅक्टिव्ह रुग्ण 89,995 आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. देशभरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत.राज्यात सध्या 65,168 रुग्ण आहेत. त्यातील 28 हजार 81 बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट 43.09  टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 2  197 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मुंबईत आता पर्यंत 38,442 कोरोनाबाधित आढळले असून 1227 जणांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्रात 2 940 कोरोनाबाधितांची वाढ झाली, तर 1,084 रुग्ण बरे झाले. दिवसभरात सर्वाधिक 99 लोकांचा बळी गेला. राज्यात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण  34 हजार 890 आहेत

महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य

तामिळनाडू -  एकूण बाधित 21 हजार 184, त्यातले 12 हजार बरे झाले, सध्या रुग्ण 9 हजार 24 , मृतांचा आकडा 160, रिकव्हरी रेट  56.64 टक्के

दिल्ली -  एकूण बाधित 18 हजार 549, त्यातले 8 हजार 075 बरे झाले, सध्या रुग्ण 10 हजार 58 रुग्ण, मृतांचा आकडा 416, रिकव्हरी रेट  43.53 टक्के

गुजरात - एकूण बाधित 16 हजार 343, त्यातले 9 हजार 230 बरे झाले, सध्या रुग्ण 6 हजार 106, मृतांचा आकडा 1007, रिकव्हरी रेट  56.47 टक्के

राजस्थान - एकूण बाधित 8 हजार 617, त्यातले 5  हजार 739 बरे झाले, सध्या रुग्ण 2 हजार 685, मृतांचा आकडा 193, रिकव्हरी रेट  66.60 टक्के

मध्यप्रदेश - एकूण बाधित 7 हजार 891, त्यातले 4 हजार 444 बरे झाले, सध्या रुग्ण 3 हजार 104, मृतांचा आकडा 343, रिकव्हरी रेट  56.31 टक्के

उत्तरप्रदेश - एकूण बाधित 7 हजार 445, त्यातले 4 हजार 410 बरे झाले, सध्या रुग्ण 2 हजार 834, मृतांचा आकडा 201, रिकव्हरी रेट  59.23 टक्के

पश्चिम बंगाल - एकूण बाधित 5 हजार 130, त्यातले 1 हजार 970 बरे झाले, सध्या रुग्ण 2 हजार 851, मृतांचा आकडा 309, रिकव्हरी रेट  38.40 टक्के



Comments



Leave a Comment



WhatsApp