देशात 24 तासांत तब्बल 27 हजार 114 नवीन कोरोना रुग्ण;संख्या आठ लाख पार

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 27 हजार 114 नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाख 20 हजार पार गेला आहे.

आतापर्यंत 2 लाख 83 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 तासांत देशात 519 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 22 हजार 123 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 15 हजार 385 कोरोनाग्रस्त रुग्णांनी या व्हायरसवर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील 5 राज्यांमध्ये सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या आढळली आहे. 24 तासांत महाराष्ट्रात 7862, तमिळनाडू 3680 कर्नाटक 2313, दिल्ली 2089, तेलंगणा 1278 नवीन रुग्ण आढळले आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp