चिंता वाढली ;जिल्ह्यातील कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांचा आलेख वाढतोच आहे,सायंकाळी रुग्ण संख्या पोहचली 261 वर

कोल्हापूर: द फायर: प्रतिनिधी:  

कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांचा आलेख दिवसेदिवस अधिक वाढतो आहे,शुक्रवारी सायंकाळी रुग्ण संख्या 261 वर पोहचली आहे.  

आज दुपारी साडेचार पर्यंत आणखी नऊ अहवाल आणि सायंकाळी तब्बल 23 जणांचे पॉझिटिव्ह आले.त्यामुळे आता पर्यंत कोरोंनाची जिल्ह्यात एकूण पॉझीटिव्ह रुग्ण संख्या 261 झाली आहे.आज दुपार पर्यंत सर्वाधिक शाहूवाडीत 78 रुग्ण आढळले आहेत.  

सकाळपर्यंत तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 11, भुदरगड- 23, चंदगड- 13, गडहिंग्लज- 5, गगनबावडा- 4, हातकणंगले- 1, कागल- 1, करवीर- 12, पन्हाळा- 13, राधानगरी- 36, शाहूवाडी- 78, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र- 7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 224 आणि पुणे-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे



Comments



Leave a Comment



WhatsApp