कराचीत विमान रहिवासी भागात इमारतीवर कोसळून 100 जण ठार झाल्याची भीती

कराची : पाकिस्तानात कराची येथे सुमारे 100 प्रवाशांसह विमान रहिवासी विभागात कोसळून 100 जण ठार झाल्याची भीतीव्यक्त करण्यात येते. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं हे विमान लाहोरवरुन कराचीला जात होते. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली.

ही दुर्घटना कराची विमानतळाजवळ घडली. ज्यावेळी विमान उतरण्याच्या तयारीत होतं, त्यावेळीच ही दुर्घटना घडली. या विमानात 97 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स होते. स्थानिक प्रशासनासह मदत आणि बचावकार्यासाठी आर्मी क्विक रिएक्शन फोर्स आणि सिंध पाकिस्तान रेंजर्सनी घटनास्थळी धाव घेतली. विमान अपघातामुळे आरोग्य मंत्र्यांनी कराचीच्या सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन आणीबाणी जाहीर केली आहे कराची विमानतळाजवळील निवासी भागात विमान कोसळल्याने घबराट पसरली. विमान कोसळले, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले. 



Comments



Leave a Comment



WhatsApp