कोल्हापुरात आणखी ३४ जणांना कोरोनाची लागण; संख्या ११०३ वर

कोल्हापूर:द फायर:प्रतिंनिधी: आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल ३४ नव्या कोरोना रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ११०३ झाली आहे.आता पर्यंत या आजाराने 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कोल्हापूर शहर पाच, पन्हाळा आठ, कसबा बावडा एक, गडहिंग्लज चार, हातकणंगले एक,  शिरोळ दोन, कागल एक, गांधीनगर एक, टोप एक, गारगोटी एक, राधानगरी एक, शाहुवाडी एक तर इचलकरंजीतील सहा व्यक्तींचा समावेश आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २१ ने वाढ झाली होती.

जिल्ह्यात क्वारंटाईन असलेल्या २०८ जणांचे स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उपचार घेणाऱ्यात सात कोरोनाग्रस्तची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणीत ६४० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp