करोना रुग्णांची काळजी घेताना मृत्यू झाल्यास १ कोटी देणार, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या रुग्णावर उपचार करताना, त्यांची काळजी घेताना कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. हा त्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या सेवेचा आदर असेल असे त्यांनी सांगितले.

करोनाच्या रुग्णांची काळजी घेताना सफाई कर्मचारी, डॉक्टर किंवा नर्स कोणाचाही मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. खासगी किंवा सरकारी सेवेतील कर्मचारी असो, त्यांना ही मदत केली जाईल असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. CommentsLeave a CommentWhatsApp