डीन डॉ. मीनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली; डॉ. रामानंद यांची नियुक्ती

कोल्हापूर :द फायर: प्रतिनिधी: कोल्हापुरातील शासकीय छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या डिन डॉ. मीनाक्षी गजभिये यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी या बदलीचे आदेश जारी केले आहेत. डॉ गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ रामानंद सध्या धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीन आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना उद्याच म्हणजे शनिवारी नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आहेत.CommentsLeave a CommentWhatsApp