कोरोना विरोधातील लढा:अझीम प्रेमजी यांनी केली ११२५ कोटींची मदत

बेंगळूर: संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अनेकजण मदत करत आहेत. आता या यादीत आणखी एका मोठ्या व्यक्तीचे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे अझीम प्रेमजी. त्यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी ११२५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. परंतु, हे पीएम केअर्स अंतर्गत दिले जाणार नाहीत. जगातल्या दानशूर व्यक्तींमध्ये अझीम प्रेमजी यांचे नाव घेतले जाते.

विप्रोकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी एकत्रित ११२५ रुपयांची मदत जाहीर केली आहेय यामध्ये सर्वाधिक हिस्सा प्रेमजी फाऊंडेशनचा असेल. विप्रो लि. १०० कोटी, विप्रो इंटरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपयांचा निधी देणार आहे.

ही रक्कम विप्रोच्या वार्षिक सीएसआर निधी अंतर्गत दिला जाणार नाही. विप्रोने म्हटले की, कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या मानवी संकटाकडे पाहता विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन मिळून ११२५ कोटी रुपये खर्च करतील. हे पैसे प्रभावित भागातील लोकांच्या मदतीसाठी, आरोग्य सुविधांवर आदींवर खर्च केले जातील. हा कार्यक्रम अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या १६०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.CommentsLeave a CommentWhatsApp